उत्पत्ती 40:1-4
उत्पत्ती 40:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षरस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला. फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला. आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले. तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले.
उत्पत्ती 40:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही काळानंतर असे झाले की, इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार यांनी त्यांच्या धन्याच्या, म्हणजे इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला. फारोह आपला रोटी भाजणारा प्रमुख व प्यालेबरदारचा प्रमुख या दोन्ही सरदारांवर रागावला आणि त्याने त्या दोघांना सुरक्षादलाचा प्रमुख, याच्या वाड्यात म्हणजे जिथे योसेफ होता, त्याच वाड्यातील तुरुंगात टाकले. तुरुंगाच्या अधिकार्याने योसेफाला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले आणि त्याने त्यांची देखरेख केली, काही काळ ते तुरुंगात राहिल्यानंतर
उत्पत्ती 40:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर असे झाले की, मिसराच्या राजाचा प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांनी आपला स्वामी मिसराचा राजा ह्याचा काही अपराध केला. प्यालेबरदारांचा नायक व आचार्यांचा नायक ह्या त्याच्या दोघा सरदारांवर फारो रागावला. तेव्हा त्याने त्यांना गारद्यांच्या सरदारांच्या वाड्यात कैदेत ठेवले; तेथेच योसेफही अटकेत होता. गारद्यांच्या सरदाराने योसेफाला त्यांच्या तैनातीस दिले; व त्याने त्यांची सेवा केली; तेथे ते काही काळ अटकेत राहिले.