उत्पत्ती 4:5-7
उत्पत्ती 4:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले. परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”
सामायिक करा
उत्पत्ती 4 वाचाउत्पत्ती 4:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”
सामायिक करा
उत्पत्ती 4 वाचा