उत्पत्ती 4:4-7
उत्पत्ती 4:4-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला; पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”
उत्पत्ती 4:4-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्विकारले. परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले. परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”
उत्पत्ती 4:4-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले, पण काईनाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले नाही, म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला. याहवेहने काईनला विचारले, “तू का संतापलास? तुझ्या चेहर्यावर निराशा का दिसते? तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”