उत्पत्ती 36:20-30
उत्पत्ती 36:20-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले. लोटानाचे पुत्र होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती. शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम. सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना. अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान. एसराला बिल्हान, जावान व अकान हे पुत्र होते. दीशानाला ऊस व अरान हे पुत्र होते. होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.
उत्पत्ती 36:20-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले. लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती. शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफो व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.) अनाहचा पुत्र: दिशोन असून त्याची कन्या ओहोलीबामाह ही होती. दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान. एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व आकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान. होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अना, दिशोन, एसर व दीशान. ते सेईर देशातील होरींचे प्रमुख होते.
उत्पत्ती 36:20-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सेईर होरी ह्याचे जे मुलगे त्या देशात राहत होते ते हे : लोटान, शोबाल, सिबोन व अना, दिशोन, एसर व दीशान; हे अदोम देशात सेईराचे होरी वंशातील सरदार होत. लोटानाचे मुलगे होरी व हेमाम हे होत; लोटानाची बहीण तिम्ना ही होती. शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम हे होते. सिबोनाचे मुलगे अय्या व अना हे होते. आपला बाप सिबोन ह्याची गाढवे राखत असता ज्याला रानात उष्ण पाण्याचे झरे सापडले तोच हा अना. अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. दिशोनाचे मुलगे हेमदान, एश्बान, यित्रान व करान हे होत. एसराचे मुलगे बिल्हान, जावान व अकान हे होत. दिशानाचे मुलगे ऊस व अरान हे होत. होर्यांपैकी जे सरदार झाले ते हे : सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार अना, सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दीशान; सेईर देशातील होर्यांचे सरदार हे होत.