उत्पत्ती 35:2-3
उत्पत्ती 35:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला. नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
उत्पत्ती 35:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला. चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.”
उत्पत्ती 35:2-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या-बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वत:ला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेलास जाऊ; तेथे मी देवासाठी वेदी बांधीन; त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले; आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता.”