उत्पत्ती 35:1-3
उत्पत्ती 35:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.” तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला. नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
उत्पत्ती 35:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग देवाने याकोबाला सांगितले की, “ऊठ, वर जाऊन बेथेल येथे राहा; आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्यापुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध.” मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या-बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वत:ला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेलास जाऊ; तेथे मी देवासाठी वेदी बांधीन; त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले; आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता.”