YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 34:25-29

उत्पत्ती 34:25-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तीन दिवसानंतर, सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी म्हणजे दीनाचे भाऊ यांनी आपआपली तलवार घेतली व ते नगर बेसावध असता त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले. त्यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले. नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीजवस्तू लुटल्या, कारण त्यांनी त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते. तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतांतील सर्व वस्तू लुटल्या. तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या स्त्रिया व मुलेबाळे देखील घेतली.

सामायिक करा
उत्पत्ती 34 वाचा

उत्पत्ती 34:25-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तिसर्‍या दिवशी असे झाले की, ते बेजार असता याकोबाचे दोन मुलगे, म्हणजे दीनेचे भाऊ शिमोन व लेवी ह्यांनी आपापली तलवार हाती घेऊन त्या नगरावर अचानक छापा घातला आणि तेथील सर्व पुरुषांची कत्तल केली. हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचाही तलवारीने वध करून ते दीनेस शखेमाच्या घरातून काढून घेऊन गेले. मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटले, कारण त्यांनी त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले होते. त्यांची शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे आणि त्या नगरातले व शेतातले होते नव्हते ते सारे त्यांनी घेतले. त्यांचे अवघे धन, त्यांची सर्व मुलेबाळे व स्त्रिया आणि त्यांच्या घरात जे काही सापडले ते सगळे हस्तगत करून त्यांनी लुटले.

सामायिक करा
उत्पत्ती 34 वाचा