उत्पत्ती 32:17-18
उत्पत्ती 32:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकोबाने कळपाच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’ तेव्हा तू त्यास असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’”
उत्पत्ती 32:17-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पहिला कळप नेणार्या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’ त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ”
उत्पत्ती 32:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने सर्वांत पुढच्या चाकराला सांगितले की, “माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारील की तू कोणाचा? कोठे चाललास? आणि ही हाकून नेत आहेस ती कोणाची?” तेव्हा त्याला सांग की, आपला सेवक याकोब ह्याची ही आहेत; ही त्याने आपला स्वामी एसाव ह्याला भेट म्हणून पाठवली आहेत; पाहा, तोही मागाहून येत आहे.”