उत्पत्ती 31:44-46
उत्पत्ती 31:44-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.” तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारकस्तंभ उभा केला. याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले.
सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचाउत्पत्ती 31:44-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर चल, तू आणि मी आपसात करार करू; आणि तो तुझ्यामाझ्यामध्ये साक्ष होवो.” तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला. मग याकोब आपल्या भाऊबंदांना म्हणाला, “धोंडे जमा करा,” आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली; आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले.
सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचा