उत्पत्ती 30:26-31
उत्पत्ती 30:26-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्यांच्यासाठी मी तुमची सेवा केली आहे त्या माझ्या स्त्रिया आणि माझी मुले द्या आणि मला जाऊ द्या, कारण मी तुमची सेवा कशी केली आहे हे तुम्हास माहीत आहे.” लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. जर तुझ्या दृष्टीने माझ्यावर तुझी कृपा असेल तर आता थांब.” नंतर तो म्हणाला, “तुला काय वेतन द्यावे हे सांग आणि ते मी देईन.” याकोब त्यास म्हणाला, “मी तुमची सेवा केली आहे आणि तुझी गुरेढोरे माझ्याजवळ कशी होती हे तुम्हास माहीत आहे. मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हास आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतःच्या घराची तरतूद कधी करू?” म्हणून लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?” याकोब म्हणाला, “तुम्ही मला काही देऊ नका. जर तुम्ही माझ्यासाठी ही गोष्ट कराल तर मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन.
उत्पत्ती 30:26-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी ज्यांच्यासाठी आपली चाकरी केली त्या माझ्या बायका व मुले मला द्या म्हणजे मी जातो, मी आपली चाकरी कशी काय केली ती आपल्याला ठाऊक आहेच.” तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर; तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभीष्ट केले आहे हे मला शकुन पाहून कळले आहे.” तो आणखी म्हणाला, “तुझे वेतन काय ते मला सांग, ते मी तुला देईन.” तो त्याला म्हणाला, “मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगराणीत कशी होती हे आपल्याला ठाऊकच आहे. मी येण्यापूर्वी आपल्याजवळ थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे; जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे; तर आता मी स्वत:च्या घरादाराचे केव्हा पाहू?” लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?” याकोब म्हणाला, “मला काही देऊ नका; माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल तर मी पूर्ववत आपले कळप चारत व सांभाळत राहीन.