उत्पत्ती 29:16-18
उत्पत्ती 29:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल. लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती. याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”
सामायिक करा
उत्पत्ती 29 वाचाउत्पत्ती 29:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लाबानास दोन मुली होत्या; वडील मुलीचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल. लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती. याकोबाची राहेलवर प्रीती बसली होती म्हणून तो म्हणाला, “आपली धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे आपली चाकरी करीन.”
सामायिक करा
उत्पत्ती 29 वाचा