उत्पत्ती 28:16-19
उत्पत्ती 28:16-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग याकोब त्याच्या झोपेतून जागा झाला, व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, आणि हे मला समजले नव्हते.” त्यास भीती वाटली आणि तो म्हणाला, “हे ठिकाण किती भीतिदायक आहे! हे देवाचे घर आहे, दुसरे काही नाही. हे स्वर्गाचे दार आहे.” याकोब मोठ्या पहाटे लवकर उठला आणि त्याने उशास घेतलेला धोंडा घेतला. त्याने तो स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर तेल ओतले. त्या ठिकाणाचे नाव लूज होते, परंतु त्याने त्याचे नाव बेथेल ठेवले.
उत्पत्ती 28:16-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, “खरोखर ह्या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते.” तो भयभीत होऊन म्हणाला, “हे किती भयप्रद स्थल आहे! हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे!” याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला. त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल (देवाचे घर) असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते.