YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 28:13-15

उत्पत्ती 28:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन. तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके होतील, आणि तुझा विस्तार पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे व दक्षिणकडे होईल. तुझ्यामध्ये व तुझ्या वंशजांमध्ये पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू जेथे कोठे जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; कारण मी तुला सोडणार नाही. मी तुला जी सर्व अभिवचने दिली ते सर्व मी करीन.”

सामायिक करा
उत्पत्ती 28 वाचा

उत्पत्ती 28:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन; तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पाहा, मी तुझ्याबरोबर आहे; जिकडे-जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन; आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”

सामायिक करा
उत्पत्ती 28 वाचा