उत्पत्ती 25:29-33
उत्पत्ती 25:29-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एकदा याकोब वरण शिजवत असता एसाव रानातून थकूनभागून आला. तेव्हा तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे!” ह्यावरून त्याचे नाव अदोम (तांबडा) पडले. याकोब त्याला म्हणाला; “पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे.” एसाव म्हणाला, “हे पाहा, मी मरणोन्मुख झालो आहे; मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” याकोब म्हणाला, “तर आताच्या आता माझ्याशी शपथ वाहा;” तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
उत्पत्ती 25:29-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता. एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले. याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.” एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?” याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.