उत्पत्ती 24:62-64
उत्पत्ती 24:62-64 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे. इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली.
उत्पत्ती 24:62-64 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता. इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले. रिबकेने नजर वर करून जेव्हा इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उडी मारून खाली उतरली.
उत्पत्ती 24:62-64 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता. एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले. रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली