उत्पत्ती 23:3-6
उत्पत्ती 23:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहाम आपल्या मयताजवळून उठून हेथींना म्हणाला, “मी तुमच्यामध्ये उपरा व परदेशी आहे; माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टिआड करीन. तेव्हा हेथी अब्राहामाला म्हणाले, “स्वामी, आमचे ऐका; आमच्यामध्ये आपण देवाचे एक सरदार आहात; आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या; आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खाजगी कबर द्यायला आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही.”
उत्पत्ती 23:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग अब्राहाम उठला आणि आपल्या मृत पत्नीपासून गेला, व हेथीच्या मुलांकडे जाऊन म्हणाला, “मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.” हेथीच्या मुलांनी अब्राहामाला म्हटले, “माझ्या स्वामी, आमचे ऐका. तुम्ही आमच्यामध्ये देवाचे सरदार आहात. आमच्याकडे असलेल्या उत्तम थडग्यात तुमच्या मयताला पुरा. आमच्यातील कोणीही आपले थडगे तुम्हास द्यायला मना करणार नाही.”
उत्पत्ती 23:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि साराहच्या मृतदेहाजवळ उभे राहून अब्राहाम हेथीच्या लोकांना म्हणाला, “या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.” हेथी लोकांनी अब्राहामाला उत्तर दिले, “महाराज, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक पराक्रमी राजपुत्र आहात. तुम्ही आपल्या मृतांसाठी स्वतःच कबर निवडून त्यांना मूठमाती द्या. आपली खाजगी कबर तुम्हाला देण्यास आमच्यातील कोणीही नकार देणार नाही.”