YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 18:11-15

उत्पत्ती 18:11-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते. म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?” परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली? परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.” नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”

सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचा

उत्पत्ती 18:11-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता; म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, “मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?” तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, “ ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली? याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.” साराह घाबरली, म्हणून ती खोटे बोलत म्हणाली, “मी हसले नाही.” परंतु ते म्हणाले, “होय, तू हसलीस.”

सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचा

उत्पत्ती 18:11-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अब्राहाम व सारा हे वृद्ध, वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, “मी जख्ख म्हातारी झाले आहे. माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय?” परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.” तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही;” कारण ती घाबरली होती; पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीसच.”

सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचा