YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 17:15-22

उत्पत्ती 17:15-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल. मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.” अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?” अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!” देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल. तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन. परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.” देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 17 वाचा

उत्पत्ती 17:15-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग देवाने अब्राहामाला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणायचे नाही; तर तिचे नाव सारा (राणी) होईल. मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन; मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील; तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” अब्राहामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, “शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? नव्वद वर्षांच्या सारेला मूल होईल काय?” अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले.” मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव इसहाक ठेव; त्याच्या पश्‍चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. इश्माएलविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे; पाहा, मी त्याचे कल्याण करीन; त्याला सफळ व बहुगुणित करीन; त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील; मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढल्या वर्षी ह्याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल; त्याच्याशीच मी आपला करार करीन.” मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर देव त्याला सोडून वर गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 17 वाचा