YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 16:1-4

उत्पत्ती 16:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते. साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले. अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली. त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.

सामायिक करा
उत्पत्ती 16 वाचा

उत्पत्ती 16:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मूलबाळ झाले नव्हते; तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, “पाहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे; तर माझ्या दासीपाशी जा; कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल,” तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून दहा वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली; आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली.

सामायिक करा
उत्पत्ती 16 वाचा