YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 15:1-5

उत्पत्ती 15:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.” अब्राम म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर नि:संतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार.” अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार.” तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.” मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”

सामायिक करा
उत्पत्ती 15 वाचा

उत्पत्ती 15:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.” अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?” अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.” नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.” मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”

सामायिक करा
उत्पत्ती 15 वाचा