उत्पत्ती 11:27-32
उत्पत्ती 11:27-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला. हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला. अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता. साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले. तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.
उत्पत्ती 11:27-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे : तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले, व हारानास लोट झाला. हारान आपला बाप तेरह ह्याच्यादेखत आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला. अब्राम व नाहोर ह्यांनी बायका केल्या; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का; मिल्का ही हारानाची कन्या; हा हारान मिल्का व इस्का ह्यांचा बाप. साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम ह्याची बायको साराय, ह्यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जायला निघाला; आणि ते हारान येथे जाऊन राहिले. तेरहाचे वय दोनशे पाच वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला.