उत्पत्ती 1:24-27
उत्पत्ती 1:24-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग देव बोलला, “प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी व वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो;” आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.” देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.
उत्पत्ती 1:24-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले. देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.” देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
उत्पत्ती 1:24-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले. परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे. मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू आणि जमिनीवर सरपटणार्या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.” याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली. त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले. पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.