उत्पत्ती 1:2-5
उत्पत्ती 1:2-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस.
सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचाउत्पत्ती 1:2-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.
सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचा