गलतीकरांस पत्र 6:8-10
गलतीकरांस पत्र 6:8-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू. म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.
गलतीकरांस पत्र 6:8-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू. म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्यांच्या कुटुंबाचे चांगले करावे.
गलतीकरांस पत्र 6:8-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.
गलतीकरांस पत्र 6:8-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावाकडून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्याकडून शाश्वत जीवन हे पीक मिळेल. म्हणून चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, आपण खचलो नाही तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग आपणाला ज्याप्रमाणे संधी मिळेल, त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः श्रद्धेमुळे जे आपल्या परिवाराचे सदस्य झाले आहेत, त्यांचे हित साधावे.