YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 6:12-16

गलतीकरांस पत्र 6:12-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात. कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे. कारण [ख्रिस्त येशूमध्ये]सुंता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती1 हीच काय ती होय. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.

गलतीकरांस पत्र 6:12-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुंता करून घेण्यास भाग पाडतात; कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी, म्हणून, तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.

गलतीकरांस पत्र 6:12-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जे दैहिकरितीने लोकांवर छाप पाडावयास पाहतात ते तुम्ही सुंता करून घ्यावी यासाठी दबाव टाकतात. ते एकाच कारणामुळे की ख्रिस्ताच्या क्रूसामुळे होणारा छळ त्यांना टाळता यावा. ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; परंतु त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरवली पाहिजे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाशिवाय इतर कशाचीही प्रौढी मिरवावी असे माझ्याकडून न होवो त्याद्वारे मी जगाला व जग मला क्रूसावर खिळलेले आहे. सुंता होणे किंवा न होणे याला मुळीच महत्व नाही; नवी उत्पत्ती हेच महत्वाचे आहे. जे हा नियम पाळतील त्या सर्वांवर व परमेश्वराच्या इस्राएलावर शांती व दया असो.

गलतीकरांस पत्र 6:12-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या क्रुसामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात. सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तुमची सुंता व्हावी असा त्यांचा आग्रह अशासाठी असतो की, तुम्ही त्यांच्या शारीरिक विधीचे पालन केले, अशी त्यांना बढाई मारता यावी. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या क्रुसाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; कारण त्याच्या क्रुसाद्वारे जगाने मला क्रुसावर खिळले आहे व मी जगाला क्रुसावर खिळले आहे. सुंता करणे किंवा न करणे याला काही अर्थ नाही परंतु नवी उत्पत्ती हेच सर्व काही आहे. जितके लोक ह्या नियमाने वागतील तितक्या लोकांना व देवाच्या इस्राएलला शांती व दया मिळो.