गलतीकरांस पत्र 6:1-3
गलतीकरांस पत्र 6:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.
गलतीकरांस पत्र 6:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्यास सौम्यतेच्या आत्म्याने पुनःस्थापित आणा; तू स्वतःही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो.
गलतीकरांस पत्र 6:1-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल. एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो.
गलतीकरांस पत्र 6:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात, ते तुम्ही अशा माणसाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. मात्र तुम्हीदेखील मोहात पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. एकमेकांची ओझी वाहण्याकरिता हातभार लावा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.