गलतीकरांस पत्र 5:16-18
गलतीकरांस पत्र 5:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; हे परस्परांस विरूद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.
गलतीकरांस पत्र 5:16-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्याकाही गोष्टी तुम्हाला करावयास पाहिजे त्या तुम्ही करू नये. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
गलतीकरांस पत्र 5:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने1 चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे; ही परस्परविरोधी आहेत, ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.
गलतीकरांस पत्र 5:16-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि देहवासना पूर्ण करू नका. देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरूद्ध आहे, दोन्ही परस्परविरुध्द आहे आणि ह्यामुळे जे काही तुम्ही करू इच्छिता ते तुमच्या हातून घडू शकत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.