YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 5:1-15

गलतीकरांस पत्र 5:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पाहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की, तुम्ही जर सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही. कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहा; तुम्ही कृपेला अंतरला आहा, कारण आपण देवाच्या आत्म्याच्याद्वारे, विश्वासाने, नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही खरेपणाला मान्य होऊ नये म्हणून तुम्हास कोणी अडथळा केला? तुम्हास जो बोलवत आहे त्या परमेश्वराची ही शिकवण नाही, ‘थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवते.’ मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारा मग तो कोणी का असेना तो दंड भोगील. आणि बंधूंनो, मी जर अजून सुंतेचा उपदेश करीत असलो, तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. कारण बंधूंनो, तुम्हास स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा. कारण, ‘जशी आपणावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा.

गलतीकरांस पत्र 5:1-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जुवाखाली सापडू नका. माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचे तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात. आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्व नाही; फक्त एकच गोष्ट अगत्याची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा. तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले? हे मन वळविण्याचे काम ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे त्याच्याकडून होत नाही. “थोडेसे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते.” मला प्रभुमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल. बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते. जे तुम्हाला हैराण करणारे आहेत, त्यांनी स्वतःला पूर्णरीतीने नपुंसक करून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे. बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वातंत्र्यासाठी पाचारण झाले आहे, ते देहवासना पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर प्रीतिने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करण्यासाठी झाले आहे. कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.” तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.

गलतीकरांस पत्र 5:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुंता करून घेणार्‍या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्‍चितार्थाने सांगतो की, ‘तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस.’ जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहात. कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला? तुम्हांला पाचारण करणार्‍याची ही बुद्धी नव्हे. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही; तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील. बंधुजनहो, मी अजून सुंतेचा उपदेश करत असलो तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.

गलतीकरांस पत्र 5:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्‍त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली, तर त्याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ताची तुम्हांला काही गरज नाही. सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा बजावून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही देवाच्या कृपेला अंतरला आहात. आम्ही मात्र विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नीतिमान ठरण्याची आशा बाळगून वाट पाहत आहोत. कारण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा सुंता करून घेणे वा न करणे यामुळे काही फरक पडत नाही; प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले? तुम्हांला पाचारण करणाऱ्याची ही बुद्धी नव्हे. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते, असे म्हटले जाते. मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही, तुमचे मन अस्थिर करणारा कोणी का असेना, त्याला देव शिक्षा करील. बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता. तुमच्यामध्ये अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःचे खच्चीकरण करून घेतील तर बरे होईल. बंधुजनहो, तुम्हांला स्वातंत्र्यासाठी पाचारण केले आहे. परंतु त्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर एकमेकांची सेवा प्रीताने करा; ‘कारण जशी आपणावर, तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,’ या एका आज्ञेत सर्व नियम सामावलेले आहेत. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल.

गलतीकरांस पत्र 5:1-15

गलतीकरांस पत्र 5:1-15 MARVBSIगलतीकरांस पत्र 5:1-15 MARVBSIगलतीकरांस पत्र 5:1-15 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा