गलतीकरांस पत्र 4:8-11
गलतीकरांस पत्र 4:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता; पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.
गलतीकरांस पत्र 4:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता; पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ व निःसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता? आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता? तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते.
गलतीकरांस पत्र 4:8-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हाला परमेश्वराची ओळख होण्यापूर्वी, तुम्ही सुद्धा, जे वास्तविक परमेश्वर नाहीत, त्यांचे दास होता. पण आता ज्याअर्थी तुम्हाला परमेश्वराची ओळख झाली आहे, किंवा परमेश्वराच्याद्वारे ओळखले गेला आहात, त्याअर्थी परत त्या दुबळ्या, दयनीय तत्वाच्या प्रभावाखाली का येता? पुन्हा त्याचे दास होण्याची आशा का धरता? तुम्ही विशेष दिवस, महिने, ॠतू आणि वर्ष हे पाळता! तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.
गलतीकरांस पत्र 4:8-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता आणि त्यामुळे जे वस्तुतः देव नाहीत, त्यांचे तुम्ही गुलाम होता. परंतु आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बल व हीन दर्जाच्या दैवतांकडे पुन्हा कसे वळता? त्यांचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा का बाळगता? विशिष्ट वार, महिने, सणाचे काळ व वर्षे हे तुम्ही पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.