YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 39:21-29

यहेज्केल 39:21-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा राष्ट्रांमध्ये मी आपला महिमा स्थापीन; त्यांना शासन करीन व आपला हात त्यांच्यावर टाकीन, हे सगळी राष्ट्रे पाहतील. त्या दिवसापासून पुढे मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल. राष्ट्रांना समजेल की इस्राएल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले; त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला म्हणून मी त्यांच्यापासून आपले मुख लपवले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हवाली केले, तेव्हा ते सर्व तलवारीने पडले. त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे, त्यांच्या अपराधांप्रमाणे, मी त्यांच्याबरोबर वर्तलो आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवले. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आता मी याकोबाचा बंदिवास उलटवीन आणि इस्राएलाच्या अवघ्या घराण्यावर दया करीन; माझ्या पवित्र नामाची ईर्ष्या धरीन. ते देशात निर्भय वसतील व कोणी त्यांना धाक घालणार नाही; मग ते लज्जित होतील; माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघाताचा त्यांना पस्तावा वाटेल. मी त्यांना राष्ट्रांतून परत आणीन, त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना जमा करीन व बहुत राष्ट्रांसमक्ष त्यांच्या ठायी आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा हे घडेल. मी त्यांना राष्ट्रांमध्ये हाकून देऊन पुन्हा मीच त्यांना त्यांच्या देशात परत आणले; त्यांच्यापैकी कोणालाही ह्यापुढे मी परदेशात राहू देणार नाही, हे पाहून मी परमेश्वर आहे असे ते समजतील; मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

सामायिक करा
यहेज्केल 39 वाचा

यहेज्केल 39:21-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“मी आपले वैभव राष्ट्रामध्ये ठेवीन आणि माझा न्याय मी केला आहे तो आणि माझा हात मी त्यांच्यावर ठेवला आहे तोही ते सर्व राष्ट्रे पाहतील. मग त्या दिवसापासून पुढे, मीच त्यांचा परमेश्वर देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल. आणि राष्ट्रे जाणतील की, इस्राएलाचे घराणे आपल्या अन्यायामुळे बंदिवासात गेले त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला म्हणून मी आपले मुख त्यापासून लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती दिले आणि ते सर्व तलवारीने पडले. मी त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे आणि पापांप्रमाणे त्यांचे केले. मी त्यांच्यापासून आपले तोंड लपविले.” म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, “आता मी याकोबाच्या लोकांस बंदिवासातून परत आणीन. इस्राएलाच्या सर्व घराण्यावर मी दया करीन. मी आपल्या पवित्र नावाबद्दल आवेशी राहीन. मग ते देशात निर्भय राहतील आणि कोणी त्यांना दहशत घालणार नाही; तेव्हा हे सर्व विसरतील. मग ते आपली लाज व मजबरोबर केलेला देशाचा विश्वासघात विसरतील. मी त्यांना राष्ट्राच्या लोकांतून परत आणीन आणि त्यांना त्यांच्या वैऱ्याच्या देशातून गोळा करीन व बहुत राष्ट्रासमोर मी त्यांच्यामध्ये पवित्र मानला गेलो म्हणजे हे घडेल. नंतर त्यांना समजेल की, मीच त्यांचा परमेश्वर आहे. कारण मीच त्यांना बंदिवान म्हणून दुसऱ्या देशात पाठवले, परंतु नंतर मीच त्यांना एकत्र गोळा करून त्यांच्या देशात परत आणले. मी त्यांच्यातील कोणालाही तेथे सोडून देणार नाही. मी यापुढे आपले मुख त्यांच्यापासून लपविणार नाही, मी आपला आत्मा इस्राएलाच्या घराण्यावर ओतीन.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

सामायिक करा
यहेज्केल 39 वाचा