YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 33:7-9

यहेज्केल 33:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता, मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन. पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो मनुष्य त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.

सामायिक करा
यहेज्केल 33 वाचा

यहेज्केल 33:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर. हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझ्याजवळ मागेन. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण तू आपल्या जिवाचा बचाव करशील.

सामायिक करा
यहेज्केल 33 वाचा