यहेज्केल 33:1-20
यहेज्केल 33:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांबरोबर बोल. त्यांना सांग की, मी देशावर तलवार आणीन तेव्हा जर देशातल्या लोकांनी आपणांपैकी एकास निवडून पहारेकरी नेमले; देशावर तलवार येत आहे असे पाहून शिंग फुंकून त्याने लोकांना सावध केले; आणि त्या शिंगाचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही म्हणून तलवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. शिंगाचा शब्द ऐकून तो सावध झाला नाही म्हणून त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील; तो सावध झाला असता तर त्याने आपला जीव वाचवला असता. पण जर पहारेकर्याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यांपैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकर्याजवळ मागेन. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर. हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझ्याजवळ मागेन. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण तू आपल्या जिवाचा बचाव करशील. हे मानवपुत्रा, तू इस्राएल घराण्यास सांग, तुम्ही म्हणता की, ‘आमचे अपराध व आमची पापे ह्यांचा भार आमच्यावर आहे व त्यामुळे आम्ही क्षय पावत आहोत, आम्ही कसे जगणार?’ त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता? तर हे मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांना सांग, नीतिमान पातक करील तर त्याची नीतिमत्ता त्याला मुक्त करणार नाही; आणि दुर्जन आपल्या पापमार्गावरून मागे फिरेल तर त्याच्या दुष्टतेमुळे त्याचे पतन होणार नाही; तसेच नीतिमान पाप करू लागला तर तो आपल्या नीतिमत्तेमुळे वाचणार नाही. मी कोणा नीतिमानास म्हणालो की, ‘तू खास वाचशील,’ आणि त्याने आपल्या नीतिमत्तेवर भिस्त ठेवून दुष्कर्म केले तर त्याची सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेल्या दुष्कर्मामुळे तो मरेलच. तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की, ‘तू मरशीलच,’ आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरील; तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही. त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत; नीतीने व न्यायाने वागत असल्यामुळे तो जगेलच. तरी तुझे बांधव म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग नीट नाही;’ पण त्यांचेच मार्ग नीट नाहीत. कोणी नीतिमान आपल्या नीतिमत्तेस मुकून पाप करू लागला तर त्यामुळे तो मरेलच. तथापि दुर्जन आपले दुराचरण सोडून नीतीने व न्यायाने वागला तर त्यामुळे तो वाचेल. तरीपण तुम्ही म्हणता की, ‘प्रभूचा मार्ग नीट नाही.’ अहो इस्राएल वंशजांनो, मी तुमचा प्रत्येकाचा न्याय तुमच्या मार्गाप्रमाणे करीन.”
यहेज्केल 33:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, “मानवाच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल त्यांना सांग की, जेव्हा मी कोणत्याही देशाविरूद्ध तलवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका मनुष्यास घेतात आणि त्यास आपल्यासाठी पहारेकरी करतात. तो देशावर तलवार येत आहे असे पाहून आणि तो त्याचे शिंग फुंकून लोकांस सावध करतो. जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही, आणि जर त्यांच्यावर तलवार आली व त्यांना मारले, तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर राहिल. जर कोणी एखाद्याने शिंगाचा आवाज ऐकला आणि लक्ष दिले नाही, त्याचे रक्त त्यावर राहिल. पण जर त्याने लक्ष दिले, तो आपला स्वतःचा जीव वाचवील. पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांस सावध केले नाही, आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन. आता, मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन. पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो मनुष्य त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील. म्हणून हे मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला सांग, तुम्ही म्हणता, की, आमचे अपराध व आमची पापे यांचा बोजा आम्हावर आहे व त्यामुळे त्यामध्ये आम्ही कुजत आहोत. आम्ही कसे जगावे? त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, मला ‘दुष्टांच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला, तर मग तो जिवंत राहील! पश्चाताप करा! तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा! कारण इस्राएल घराण्यांनो, तुम्ही का मरावे?’ आणि मानवाच्या मुला, तू तुझ्या लोकांस सांग, धार्मिक पाप करील तर त्याची धार्मिकता त्यास वाचविणार नाही. आणि दुष्टाने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर दुष्टतेमुळे त्याचा नाश होणार नाही. कारण धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचू शकणार नाही. जर मी धार्मिकाला म्हणालो, तो खचित जिवंत राहिल! आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील, तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्ये मी आठवणार नाही. त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे तो मरेल. आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील! पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय्य आहे ते केले, जर दुष्ट गहाण परत देईल, व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमांमध्ये वागेल तर तो वाचेलच, तो मरणार नाही. त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे, तो खचित जगेल. पण तुझे लोक म्हणतात, प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, परंतु तुझे मार्ग योग्य नाहीत! जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला, तर तो त्यामध्ये मरेल. आणि जेव्हा दुष्ट आपल्या दुष्टतेपासून फिरून जे योग्य व न्याय्य आहे ते करतो तर तो त्या गोष्टीमुळे जगेल. पण तुम्ही लोक म्हणता, प्रभूचा मार्ग बरोबर नाही! इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुमच्या प्रत्येकाचा न्याय त्याच्या मार्गाप्रमाणे करीन.”
यहेज्केल 33:1-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, तुझ्या लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा मी एका देशावर तलवार आणतो, तेव्हा त्या देशाचे लोक त्यांच्या लोकांतील एकाची निवड करून त्याची पहारेकरी म्हणून नेमणूक करतात, आणि ती तलवार देशावर येत आहे असे पाहताच लोकांना सावध करण्यासाठी तो कर्णा वाजवितो, तेव्हा जर कोणी कर्ण्याचा आवाज ऐकूनही इशार्याकडे लक्ष देत नाही आणि तलवार येऊन त्यांचा जीव घेते, तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. जरी त्यांनी कर्ण्यांचा आवाज ऐकला तरी इशार्याकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. जर ते सावध झाले असते, तर त्यांनी स्वतःस वाचविले असते. परंतु तलवार येत आहे असे पाहूनही इशारा देण्यासाठी पहारेकरी कर्णा वाजवित नाही आणि तलवार येऊन त्यातील एकाचा जीव घेते, तर त्यांच्या पापामुळे त्या व्यक्तीचा जीव गेला तरी त्यांच्या रक्ताचा जाब मी त्या पहारेकर्याकडून घेईन.’ “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘अरे दुष्टा, तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू सांगत नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या मार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील, परंतु तू स्वतः वाचशील. “मानवपुत्रा, इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही असे म्हणता: “आमचे अपराध व पापे आम्हावर भारी आहेत आणि त्यामुळे आम्ही नाश पावत आहोत. मग आम्ही कसे जगू शकतो?” ’ त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’ “म्हणून, हे मानवपुत्रा, तुझ्या लोकांना सांग, ‘एखाद्या नीतिमान व्यक्तीने जर आज्ञाभंग केला, तर त्या व्यक्तीची पूर्वीची नीतिमत्ता मोजण्यात येणार नाही. आणि एखादा दुष्ट पश्चात्ताप करतो, त्या व्यक्तीची पूर्वीची दुष्टता त्याच्यावर दंड आणणार नाही. नीतिमान व्यक्ती जो पाप करतो, तो जरी पूर्वी नीतिमान असला तरी त्याला जगू दिले जाणार नाही.’ जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील. आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले; गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत. पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्यांच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जे न्याययुक्त व योग्य ते त्यांनी केले आहे; त्यामुळे ते खचितच जगतील. “तरी तुझे लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु त्यांचेच मार्ग न्याययुक्त नाहीत. जर नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि जे वाईट ते करतात, तर त्यामुळे ते मरतील. आणि जर दुष्ट व्यक्ती त्यांच्या दुष्टाईपासून वळतील आणि जे न्याययुक्त व योग्य ते करतील, तर त्यामुळे ते जगतील. तरीही तुम्ही इस्राएली लोक म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु तुम्हा सर्वांच्या मार्गांनुसार मी तुमचा न्याय करेन.”