YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 30:1-19

यहेज्केल 30:1-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जळो तो दिवस, असा हाहाकार करा. कारण दिवस समीप आला आहे; परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; तो अभ्रमय दिवस आहे; तो विधर्म्याचा शासनदिन आहे. तेव्हा मिसर देशावर तलवार येईल, लोकांचा वध होऊन ते मिसरात पडतील तेव्हा कूशातील लोकांना वेणा येतील; मिसराचा समुदाय हरण केला जाईल, त्याचे पाये मोडून टाकतील. कूशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाती व कूबी आणि त्यांच्याबरोबर करारमदार केलेल्या देशांचे लोक त्यांच्यासह तलवारीने पडतील. प्रभू परमेश्वर म्हणतो, मिसर देशाला आधार देणारे लोक पडतील, त्यांच्या पराक्रमाचा तोरा उतरेल; मिग्दोलापासून सवेनेपर्यंत ते तलवारीने पडतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ते वैराण देशामध्ये उद्ध्वस्त होऊन पडतील, उजाड नगरांमध्ये त्यांची नगरे उद्ध्वस्त होऊन पडतील. मी मिसरास आग लावीन व त्याचे सर्व साहाय्यकर्ते नष्ट होतील, तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे. त्या दिवशी त्या निश्‍चिंत कूशी लोकांना घाबरवून सोडण्यासाठी माझ्याकडील जासूद जहाजात बसून जातील; मिसरावर प्रसंग आला तेव्हाच्याप्रमाणे त्यांना वेदना होतील; कारण पाहा, तो प्रसंग येत आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हस्ते मी मिसराचा लोकसमुदाय नाहीसा करीन. तो व सर्व लोकांमध्ये भयंकर असे त्याचे लोक ह्यांना ह्या देशाचा नाश करायला आणीन; ते मिसरावर आपल्या तलवारी उपसून वधलेल्या मनुष्यांनी सर्व देश भरून टाकतील. मी नद्या कोरड्या करीन, ही भूमी विकून दुष्ट मनुष्यांच्या हाती देईन आणि परक्यांच्या हातून हा देश व ह्यातले सर्वकाही ह्यांची नासधूस करवीन; मी परमेश्वर हे बोललो आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन. मी पथ्रोस उजाड करीन, सोअनास आग लावीन, नो ह्याला न्यायदंड करीन. मिसरचा दुर्ग जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन व नो येथील लोकसमुदायाचा उच्छेद करीन. मी मिसरास आग लावीन; सीन वेणा देईल; नो छिन्नभिन्न होईल, नोफावर तर भरदिवसा वैरी उठतील. आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील; ही नगरे जिंकली जातील. मिसर्‍यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील. ह्या प्रकारे मी मिसरास न्यायदंड करीन; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”

सामायिक करा
यहेज्केल 30 वाचा

यहेज्केल 30:1-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, “मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे! तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल. मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील. कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील. परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील. जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे! प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन. तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील. मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्यांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन. मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन. कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन. मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील. आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील. जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल. अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणीन, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”

सामायिक करा
यहेज्केल 30 वाचा

यहेज्केल 30:1-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आक्रोश करून सांग, “त्या दिवसाला हाय हाय!” कारण दिवस जवळ आहे, याहवेहचा दिवस जवळ आहे; तो आभाळाचा दिवस, राष्ट्रांच्या नाशाचा दिवस असेल. इजिप्तविरुद्ध एक तलवार येईल आणि कूशवर वेदना येतील. जेव्हा वधलेले इजिप्तमध्ये पडतील, तिची संपत्ती काढून घेतली जाईल आणि तिचे पाये मोडून टाकले जातील. कूश आणि लिबिया, लूद व संपूर्ण अरब, कूब आणि कराराच्या देशाचे लोक इजिप्तबरोबर तलवारीने पडतील. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. मिग्दोलपासून असवानपर्यंत सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये, ते ओसाड पडतील, आणि त्यांची शहरे उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये पडतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे, मी जेव्हा इजिप्तला आग लावेन, तेव्हा तिला मदत करणार्‍यांचाही चुरा होईल. “ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हातून मी इजिप्तच्या टोळीचा अंत करेन. तो व त्याचे सैन्य; जे राष्ट्रांमध्ये सर्वाधिक क्रूर आहेत; त्यांना इजिप्तचा नाश करण्यास आणले जाईल. ते इजिप्तविरुद्ध त्यांची तलवार उपसतील आणि वधलेल्यांनी देश भरून टाकतील. नाईल नदीचे पाणी मी आटवून टाकेन आणि तो देश दुष्ट राष्ट्रांना विकून टाकेन; विदेशी लोकांच्या हातून मी तो देश व त्यातील सर्वकाही ओसाड करेन. मी याहवेह हे बोललो आहे. “ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘मी मूर्तींचा नाश करेन आणि मेम्फीस येथील प्रतिमांचा मी शेवट करेन. इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील, आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन. इजिप्तचा पथरोस मी उजाड करेन, सोअन नगराला आग लावेन आणि नओ नगराला दंड देईन. सीन जो इजिप्तचा बळकट दुर्ग, यावर मी माझा कोप ओतेन, आणि नओचे सैन्य नष्ट करेन. मी इजिप्तला आग लावेन; सीन वेदनांनी तळमळेल. नओ वादळात उडून जाईल; मेम्फीस सातत्याने कष्टात राहील. ओन व पी-बेसेथचे तरुण पुरुष तलवारीने पडतील, आणि शहरे बंदिवासात जातील. तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन; तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन. ती ढगांनी झाकली जाईल, आणि तिची गावे बंदिवासात जातील. याप्रकारे मी इजिप्तवर दंड आणेन आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”