YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 3:24-27

यहेज्केल 3:24-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले; त्याने माझ्याबरोबर भाषण करून म्हटले, जा, तू स्वतःला आपल्या घरात कोंडून घे. हे मानवपुत्रा, पाहा, तुला बंधनांनी जखडून बांधतील आणि तुला बाहेर त्या लोकांमध्ये जाता येणार नाही; तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे. तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.

सामायिक करा
यहेज्केल 3 वाचा

यहेज्केल 3:24-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देवाच्या आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पाया वर उभे केले; आणि माझ्याशी बोलला, व म्हणाला, जा आणि स्वतःला आपल्या घरात बंद करून ठेव, आता, मानवाच्या मुला, ते तुला दोरीने बांधतील म्हणून त्याच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही. तुझी जीभ टाळूला चिकटेल असे मी करेन आणि तू मुका होशील त्यांना धमकावु शकणार नाहीस, कारण ते फितुर घराणे आहे. पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे.

सामायिक करा
यहेज्केल 3 वाचा