यहेज्केल 3:1-15
यहेज्केल 3:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल.” तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, “जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर.” मी तो सेवन केला तेव्हा तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांच्याजवळ माझी वचने बोल. कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्राएल घराण्याकडे मी तुला पाठवतो;” ज्यांची बोली तुला समजत नाही अशी बाबर ओठांची व जड जिभेची अनेक राष्ट्रे आहेत, त्यांच्याकडे मी तुला पाठवत नाही. त्यांच्याकडे मी तुला पाठवले असते तर खरोखर त्यांनी तुझे ऐकले असते. पण इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाहीत; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे. पाहा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करतो. त्यांच्या कपाळासारखे तुझे कपाळ कठीण करतो. मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करतो; त्यांना तू भिऊ नकोस, त्यांच्या कटाक्षांनी कापू नकोस; ती तर फितुरी जात आहे.” आणखी तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जी सर्व वचने मी तुला सांगतो ती आपल्या हृदयात साठव, ती कानाने ऐक. जा, पकडून नेलेल्या तुझ्या लोकांच्या वंशजांकडे जाऊन त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मग ते तुझे ऐकोत किंवा न ऐकोत.” तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला. आणि त्या प्राण्यांचे पंख एकमेकांना लागत त्यांचा आवाज आणि त्यांच्या बाजूंना असलेल्या चाकांचा आवाज, असा प्रचंड वेगाचा शब्द मी ऐकला. मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला. त्यानंतर धरून नेलेले लोक राहत असत तेथे त्यांच्याकडे खबार नदीच्या तीरी तेल-अबीब ह्या ठिकाणी मी आलो आणि ते बसले होते तेथे मी बसलो; भयचकित होऊन सात दिवस त्यांच्यामध्ये मी बसून राहिलो.
यहेज्केल 3:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, जो ग्रंथ तुला प्राप्त झाला आहे तो ग्रंथ तू खाऊन टाक! आणि जा इस्राएलाच्या घराण्याशी बोल.” म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला. तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले. तेव्हा तो मला म्हणाला “मानवाच्या मुला इस्राएलाच्या घराण्याकडे जा आणि माझे शब्द त्यांना सांग. अपरिचित वाणी आणि कठोर भाषेच्या लोकांजवळ मी तुला पाठवणार नाही, परंतू इस्राएलाच्या घरण्याकडे मी तुला पाठवतो; मोठी राष्ट्रे अपरिचित, कठिण भाषेचे, ज्यांची भाषा समजत नाही त्यांच्याकडे पाठवत नाही! जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले तर ते तुझे ऐकतील! परंतु इस्राएलाचे घराणे तुझे ऐकण्याची इच्छा दाखवणार नाही, ते माझे ही ऐकण्याची इच्छा दाखवत नाहीत. म्हणून इस्राएलाचे सर्व घराणे हट्टी कपाळाचे आणि कठिण मनाचे आहेत. पहा! मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्या सारखा त्यांच्या कठोर कपाळासारखे तुझे कपाळ केले आहे. तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे! त्यांना भयभीत होऊ नको; किंवा निराश होऊ नको; कारण ते पहिल्यापासून फितुर आहेत.” तेव्हा तो मला म्हणाला; “मानवाच्या मुला, जे काही मी तुला बजावले आहे ते आपल्या मानात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक! मग गुलामांकडे तुझ्या लोकांजवळ जा आणि त्यांच्याशी बोल; ते ऐको किंवा न ऐको, परमेश्वर देव असे सांगतो” देवाच्या आत्म्याने मला वर उचलले, आणि माझ्या मागे मी भुकंपासारखा मोठा आवाज ऐकला, तो म्हणाला; त्याच्या स्थानातून परमेश्वर देवाचे गौरव धन्य आहे! ऐकमेकांना स्पर्श करणाऱ्या जिवंत प्राण्यांचा आवाज त्या नंतर मी ऐकला व त्यांच्या बरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भुकंपाचाही आवाज होत होता! देवाच्या आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि माझ्या आत्म्यात कडवट पण घेऊन आलो, परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला! तेल-अबीब या ठिकाणी मी गुलामांकडे गेलो, जे खबार ओढ्याच्या शेजारी राहत होते, आणि मी तेथे सात दिवस राहिलो आणि चकीत होऊन व्यापून गेलो.
यहेज्केल 3:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.” तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली. तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली. नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग. अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे; दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते. परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत. पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन. मी तुझे कपाळ हिऱ्यापेक्षा अधिक कठोर, गारगोटीपेक्षा कठीण करेन, जरी ते बंडखोर लोक आहेत तरी त्यांना भयभीत होऊ नको; किंवा घाबरू नको.” आणि तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुझ्याशी जी वचने बोलतो ती काळजीपूर्वक ऐक आणि आपल्या हृदयात जपून ठेव. तर आता निर्वासित असलेल्या तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांच्याशी बोल. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात,’ मग ते तुझे ऐको किंवा न ऐकोत.” मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले. हा त्या जिवंत प्राण्यांच्या पंखांचा आवाज होता, जे एकमेकांच्या पंखांना घासत होते आणि त्याच्या बाजूंना असलेल्या चाकांचा मोठ्या गर्जनेचा आवाज होता. तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता. खेबर नदीजवळ तेल-अवीवकडे राहत असलेल्या निर्वासित लोकांकडे मी आलो आणि ते जिथे राहत होते, तिथे त्यांच्याबरोबर; मी अतिदुःखाने सात दिवस बसलो.