YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 20:1-26

यहेज्केल 20:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बाबेलातील बंदिवासाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी असे घडेल, इस्राएलाचे वडील परमेश्वर देवाला विचारणा करण्यास आले, आणि मज पुढे येऊन बसले. परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, आणि म्हणाला मानवाच्या मुला इस्राएलाच्या वडीलांना जाहीर करून सांग की प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारायला आला काय? प्रभू परमेश्वर देव म्हणतो, माझ्या जीवीताची शपथ मी तुला प्रश्न विचारु देणार नाही, असे परमेश्वर देव जाहीर करतो. तू त्यांचा न्याय करु नये काय? मानवाच्या मुला तू त्यांचा न्याय करु नये काय? त्यांच्या वाडवडीलांनी केलेली घृणास्पद कृत्ये त्यांना सांग प्रभू परमेश्वर म्हणतो, मी ज्या दिवशी इस्राएलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रकट झाले, मी माझे हात उंचावून शपथ वाहिली मी तुमचा परमेश्वर देव असे म्हणतो. त्या दिवशी मी आपले हात उंचावून त्यांच्याशी शपथ वाहीली की, मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणिन आणि मी त्यांना खात्रीपूर्ण त्यांच्यासाठी निवडलेल्या देशात आणिन ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहे, तो देश सुंदर असून सर्व देशांचा मुकुट मणी आहे. तेव्हा मी त्यास म्हटले की प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती देवत अशा तिरस्करणीय वस्तू आपल्या दृष्टी समोरुन फेकून द्या, तुम्ही त्यामुळे विटाळू नये, असे तुमचा देव परमेश्वर म्हणतो. तरीही त्यांनी माझा तिव्र विरोध केला आणि ते माझे ऐकेनात त्यातीत प्रत्येकाने मिसर देशातील मूर्ती, दैवत अशा तिरस्कार आणणाऱ्या वस्तू फेकून दिल्या नाही आणि म्हणून मी त्यांना त्वेषाने माझा क्रोध मिसरावर ओतीन, तरच मी समाधान पावेन, हा माझा केलेला ठराव आहे. माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहत आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो. मी त्यास मिसर देशातून बाहेर पाठवले आणि त्यांना रानात आणिले. मी त्यांना माझे नियम व निर्णय लावून दिले त्यास दाखवून दिलेत ह्यासाठी की जो कोणी हे पाळेल त्यांचा बचाव होईल. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये चिन्ह म्हणून त्यास शब्बाथ दिले, ह्यासाठी की त्यांना समजावे की त्यास पवित्र करणारा मी परमेश्वर देव आहे. रानामध्ये इस्राएल घराण्याने माझा तीव्र विरोध केला. ते माझ्या नियमांनी चालले नाहीत, ज्यांच्यामुळे त्यांचा बचाव होईल, त्याऐवजी त्यांनी माझ्या नियमांचा नकार केला, त्यांनी माझ्या पवित्र शब्बाथाचा अनादर केला; म्हणून मी म्हणालो त्यांचा रानामध्येच नाश करण्यासाठी मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतीन असे मी म्हटले. तथापि माझ्या पवित्र नामाचा अनादर होऊ नये म्हणून त्या राष्ट्रा देखत त्यांना मिसरा बाहेर आणून कृती केली. म्हणून मी माझा हात उंचावून रानात प्रतिज्ञा वाहिली; जो देश त्यांना देण्यासाठी ज्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, जो सर्वात सुंदर असून सर्व देशाचा मुकुटमणी आहे, अशा देशात मी त्यांना घेऊन जाणार नाही. मी शपथ वाहिली कारण त्यांनी माझा करार मोडला माझ्या नियमांनी ते चालले नाहीत आणि माझ्या शब्बाथाचा अनादर केला, कारण त्यांचे अंतःकरण मूर्तीशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले. तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी केली, कारण त्यांची होणारी हानी पाहून त्यांचा रानात सर्वनाश करणार नाही. रानात मी त्यांच्या पुत्रपोत्रास म्हणालो तुम्ही आपल्या वाडवडीलांच्या नियमांनी चालू नका, तुम्ही त्यांचा करार पाळू नका किंवा मूर्तीपूजा करून स्वतःस अशुद्ध करु नका. मी तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या नियमांनी चाला माझे निर्णय पाळून माझ्या आज्ञेत रहा. माझे शब्बाथ पवित्र पणे पाळा ह्यासाठी की, ते तुमच्या व माझ्यामध्ये चिन्हा दाखल होतील. ह्यासाठी की मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळून येईल. परंतू त्यांच्या मुलामुलींनी देखील माझ्या विरोधात तीव्र विरोध केला. ते नियमांनी चालले नाहीत किंवा करार पाळला नाही, ज्या आज्ञा पाळल्याने मनुष्य वाचतो. त्यांनी माझ्या शब्बाथाचा अनादर केला, तेव्हा मी ठरवले की मी रानात त्यांच्यावर क्रोधाची वृष्टी करावी ह्यासाठी माझा क्रोध पूर्ण करावा. परंतू मी आपल्या नामास्तव आपला हात आवरला ह्यासाठी की ज्या राष्ट्रातून इस्राएलांना मी बाहेर त्यांच्या दृष्टीसमोर माझा अनादर होऊ नये, म्हणून मी कृती केली आहे. रानात मी हात उंचावून अशी शपथ वाहिली की, मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन. हे करण्यासाठी मी ठराव केला ह्यासाठी की, जेव्हापासून त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या शब्बाथाचा व नियमांचा अनादर केला. कारण त्यांची दृष्टी त्यांच्या वाडवडीलांच्या मूर्तीकडे लागली होती. म्हणून मी देखील जे चांगले नाहित असे नियम त्यांना दिले, ज्यांनी ते जगावयाचे नाहीत असे निर्णय मी त्यास दिले. त्यांच्या मिळालेल्या देणगी व्दारे मी त्यांना अशुद्ध केले. हे सर्व झाल्यामुळे त्यांना गर्भाशयातून प्रथम जन्मलेल्या बालकांचा अग्नीत होम केला, हे केल्याने त्यांनी भीती बाळगावी आणि समजावे की मी परमेश्वर देव आहे.

सामायिक करा
यहेज्केल 20 वाचा

यहेज्केल 20:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, इस्राएलातील काही वडील लोक याहवेहकडून विचारण्यास आले आणि ते माझ्यापुढे बसले. तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्याकडून विचारपूस करण्यास तुम्ही आला आहात काय? माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ “तू त्यांचा न्याय करशील काय? हे मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करशील काय? तर त्यांच्या पूर्वजांच्या अमंगळ कृत्यांविषयी त्यांचा निषेध कर आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलची मी निवड केली, त्या दिवशी, मी शपथ घेतली व याकोबाच्या वंशजांकडे आपला हात उंच केला व मी स्वतः इजिप्तमध्ये त्यांना प्रकट झालो. उंचावलेल्या हाताने मी त्यांना म्हटले, “मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे. आणि मी त्यांना म्हटले, “तुम्ही प्रत्येकाने ज्या घृणास्पद मूर्तींवर आपली नजर लावली आहे, त्या टाकून द्या, आणि इजिप्तच्या मूर्तींनी स्वतःस विटाळू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” “ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन. परंतु माझ्या नावासाठी मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. ज्या लोकांमध्ये ते राहिले आणि ज्यांच्यासमोर मी इस्राएली लोकांना प्रकट झालो, त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी असे केले म्हणून त्यांना मी इजिप्तमधून काढले आणि त्यांना रानात आणले. त्यांना मी माझे विधी दिले आणि त्यांना माझे नियम कळविले, ज्यामुळे जे लोक त्याचे पालन करतील ते जगतील. त्याचप्रमाणे आमच्यामधील चिन्ह म्हणून मी त्यांना माझा शब्बाथ दिला, यासाठी की त्यांनी जाणावे की मी याहवेहने त्यांना पवित्र केले आहे. “ ‘तरीही इस्राएली लोकांनी रानात माझ्याविरुद्ध बंड केले. त्यांनी माझे विधी पाळले नाही तर माझ्या नियमांचा धिक्कार केला; ज्यामुळे ज्यांनी नियमाचे पालन केले असते ते जगले असते; आणि त्यांनी माझ्या शब्बाथाला पूर्णपणे अपवित्र केले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात त्यांचा नाश करेन. परंतु ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले. आणि रानात माझा हात उंच करून मी त्यांच्याशी शपथ वाहिली की दूध व मध वाहणारा देश; जो सर्वात सुंदर देश मी त्यांना देऊ केला होतात, त्यात मी त्यांना नेणार नाही; कारण त्यांनी माझ्या नियमांचा धिक्कार केला आणि माझ्या विधींचे पालन केले नाही आणि माझे शब्बाथ विटाळले. कारण त्यांचे हृदय त्यांच्या मूर्तींकडे लागलेले होते. तरीही मी त्यांच्याकडे दयेने पाहिले आणि रानात मी त्यांचा नाश करून त्यांचा शेवट केला नाही. त्यांच्या लेकरांना मी रानात म्हटले, “तुमच्या आईवडिलांच्या कायद्याचे अनुसरण करू नका किंवा त्यांचे नियम पाळू नका व त्यांच्या मूर्तींमुळे तुम्हास विटाळू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्या विधींचे अनुसरण करा आणि काळजीपूर्वक माझे नियम पाळा. माझे शब्बाथ पवित्र माना, यासाठी की ते आपल्यातील चिन्ह असावे. मग तुम्ही जाणाल की मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.” “ ‘परंतु त्यांच्या लेकरांनी माझ्याविरुद्ध बंड केले: त्यांनी माझ्या विधींचे अनुसरण केले नाही, माझे नियम त्यांनी काळजीपूर्वक पाळले नाही, ज्याविषयी मी म्हटले होते, “की जे त्याचे पालन करतील ते त्यानुसार जगतील,” आणि त्या लोकांनी माझे शब्बाथ विटाळले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात माझा कोप त्यांच्याविरुद्ध दाखवेन. तरीही मी माझा हात आवरला आणि ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले. आणि उंचावलेल्या हाताने मी त्यांच्याशी रानात शपथ वाहिली, की राष्ट्रांमध्ये मी त्यांची पांगापांग करेन आणि देशांमध्ये मी त्यांना विखरेन, कारण त्यांनी माझे नियम पाळले नाहीत, तर माझ्या विधींचा धिक्कार केला व माझे शब्बाथ विटाळले आणि त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या मूर्तींची वासना बाळगली. म्हणून मी त्यांना इतर जे चांगले नाहीत असे कायदे दिले आणि असे नियम ज्यामुळे ते जगणार नाहीत; त्यांच्याच भेटींनी मी त्यांना अशुद्ध केले; म्हणजेच प्रत्येक प्रथम जन्मलेल्याचा यज्ञ अशासाठी की मी त्यांना भयाने भरावे, म्हणजे ते जाणतील की मीच याहवेह आहे.’

सामायिक करा
यहेज्केल 20 वाचा

यहेज्केल 20:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सातव्या वर्षी पाचव्या महिन्यात दशमीस असे झाले की इस्राएलाचे काही वडील प्रश्‍न विचारण्यासाठी येऊन माझ्यासमोर बसले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांबरोबर बोल; त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्‍न विचारण्यास आलात काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाही. तू त्यांचा न्याय करू नये काय? मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करू नये काय? त्यांना त्यांच्या वडिलांची अमंगळ कृत्ये विदित कर. त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी मी इस्राएलास निवडून घेतले, याकोब वंशाकडे मी हात उचलून शपथ वाहिली, मिसर देशात त्यांना मी प्रकट झालो, हात उचलून त्यांना शपथपूर्वक म्हणालो की, मी परमेश्वर तुमचा देव आहे. त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुमच्यासाठी पाहिलेल्या देशात आणीन; तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय. तेव्हा मी त्यांना म्हटले, तुम्ही सर्वांनी आपल्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू फेकून द्याव्यात व मिसर देशाच्या मूर्तींनी आपणांस विटाळ होऊ देऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे. तरीपण ते माझ्याशी फितूर झाले व माझे ऐकेनात; त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत; मिसर देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत; तेव्हा मिसर देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले. तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो. मी त्यांना मिसर देशातून काढून रानात आणले. मी त्यांना आपले नियम लावून दिले, माझे निर्णय त्यांना दाखवून दिले; हे जो कोणी पाळील तो त्यायोगे वाचेल. आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे. तरीपण रानात इस्राएल घराणे मला फितूर झाले. ज्यांच्या पालनाने मनुष्य वाचतो, त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत, माझे निर्णय त्यांनी टाकून दिले व माझे शब्बाथ फार भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांचा नाश करावा असे मी म्हटले. तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नामासाठी मी अशी कृती केली. आणखी मी हात उचलून रानात अशी शपथ घेतली की दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत व जो सर्व देशांचा मुकुटमणी आहे असा देश मी त्यांना दिला होता, त्यात मी त्यांना आणणार नाही; कारण त्यांचे अंतःकरण त्यांच्या मूर्तींशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले, ते माझ्या नियमांप्रमाणे चालले नाहीत, व त्यांनी माझे शब्बाथ भ्रष्ट केले. तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी करून त्यांची गय केली, रानात त्यांचा नाश केला नाही, त्यांचा पूर्ण शेवट केला नाही. तसेच रानात मी त्यांच्या वंशजांना म्हणालो, तुम्ही आपल्या वडिलांच्या नियमांप्रमाणे चालू नका, त्यांच्या निर्णयांना अनुसरू नका, व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळू नका. मी परमेश्वर तुमचा देव आहे; माझ्या नियमांना अनुसरून चाला, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागा; माझे शब्बाथ पवित्र माना, म्हणजे ते तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होतील व तुम्हांला समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे. तरीपण ते वंशजही मला फितूर झाले; जे पाळल्याने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत; ते माझे निर्णय त्यांनी टाकून दिले; माझे शब्बाथ त्यांनी भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले. तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून मी आपला हात आवरला; माझ्या नामासाठी अशी कृती मी केली. आणखी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन व त्यांना देशोधडीस लावीन अशी प्रतिज्ञाही मी रानात हात उचलून केली; कारण त्यांनी माझे निर्णय पाळले नाहीत; माझे नियम टाकून दिले, माझे शब्बाथ भ्रष्ट केले, व त्यांचे डोळे त्यांच्या वडिलांच्या मूर्तींकडे लागले. तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यांना दिले, ज्यांनी ते जगायचे नाहीत असे निर्णय त्यांना दिले. मी त्यांची नासधूस केल्याने त्यांना असे समजावे की मी परमेश्वर आहे; मी त्यांना त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला.

सामायिक करा
यहेज्केल 20 वाचा