यहेज्केल 14:3-4
यहेज्केल 14:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयांत आपल्या मूर्ती वागवल्या आहेत; त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवले आहे; अशा लोकांना मी आपल्याला प्रश्न विचारू देईन काय? ह्याकरता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो त्याला माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.
यहेज्केल 14:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन? याकरिता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.
यहेज्केल 14:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मानवपुत्रा, या माणसांनी आपल्या हृदयात मूर्ती बसविल्या आहेत आणि त्यांच्या मुखासमोर त्यांनी दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवले आहेत. त्यांना मी, मला प्रश्न विचारू द्यावा काय? म्हणून त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलमध्ये जेव्हा कोणी आपल्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्यासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग संदेष्ट्याकडे जातात, मी सार्वभौम याहवेह, स्वतः त्यांची मोठी मूर्तिपूजा लक्षात ठेवून त्यांना उत्तर देईन.