YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 6:2-9

निर्गम 6:2-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग देव मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो; परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. ज्या इस्राएलाला मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे. तेव्हा इस्राएलाला सांग, मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हास त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन, आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन. मी तुम्हास आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून काढून आणतो तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास समजेल. जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यामध्ये मी तुम्हास नेईन; व तो मी तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांस सांगितले. परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते नाउमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेनात.

सामायिक करा
निर्गम 6 वाचा

निर्गम 6:2-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना सर्वसमर्थ1 देव म्हणून प्रकट झालो तथापि परमेश्वर2 ह्या माझ्या नावाने मी त्यांना ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे; शिवाय ह्या इस्राएल लोकांना मिसर्‍यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन; मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल. आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’ मोशेने हे सारे इस्राएल लोकांना सांगितले; पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात.

सामायिक करा
निर्गम 6 वाचा