YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 40:1-11

निर्गम 40:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर. त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक. मेज आत नेऊन त्यावरील सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव. दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव. दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान गंगाळ ठेवून त्यात पाणी भर. सभोवती अंगण कर व त्याच्या फाटकास पडदा लाव. अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. होमवेदी व तिचे सर्व सामान ह्यांना अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे वेदी परमपवित्र होईल. गंगाळ व त्याची बैठक ह्यांना अभिषेक करून गंगाळ पवित्र कर.

सामायिक करा
निर्गम 40 वाचा

निर्गम 40:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर. साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल. मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव. दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव. दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यामध्ये पाणी भर. सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव. अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याच्या सर्व वस्तू पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल. होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल. गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.

सामायिक करा
निर्गम 40 वाचा