YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 4:27-31

निर्गम 4:27-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. परमेश्वराने त्यास जे सर्वकाही सांगून पाठवले होते ते, जी सर्व चिन्हे करून दाखवायची आज्ञा दिली होती ती मोशेने अहरोनाला सांगितली. मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजांचे सर्व वडीलजन एकत्र जमवले. नंतर परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळवले; त्यांना चिन्हे करून दाखवली. तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला. परमेश्वराने इस्राएली घराण्याची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची उपासना केली.

सामायिक करा
निर्गम 4 वाचा

निर्गम 4:27-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “मोशेला भेटण्यास तू रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले. मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठवले व जी चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने अहरोनाला सांगितली. नंतर मोशे व अहरोन ह्यांनी जाऊन इस्राएलवंशाचे सर्व वडील जन जमवले; आणि परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांना कळवले आणि त्यांना चिन्हे करून दाखवली. तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.

सामायिक करा
निर्गम 4 वाचा