YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 4:18-21

निर्गम 4:18-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.” मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, मिसर देशात परत जा; कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत.” मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशास परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला. परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मिसरास परत जाशील तेव्हा पाहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारोपुढे करून दाखव; तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही.

सामायिक करा
निर्गम 4 वाचा

निर्गम 4:18-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्यास म्हणाला, “मला मिसरातील माझ्या भाऊबंदांकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा. मिद्यान प्रांतात असताना परमेश्वर मोशेला म्हणाला, “आता मिसर देशात परत जा. जे लोक तुला ठार मारू पाहत होते ते आता मरण पावले आहेत.” तेव्हा मोशेने आपली पत्नी व आपल्या मुलांना गाढवावर बसवले व त्यांना घेऊन तो मिसर देशाला माघारी जायल निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिसरात परत जाशील तेव्हा पाहा, जे सर्व चमत्कार मी तुझ्या हाती ठेवले आहे ते तू फारोपुढे करून दाखव. तथापि मी त्याचे मन कठीण करीन, आणि तो लोकांस जाऊ देणार नाही.

सामायिक करा
निर्गम 4 वाचा