YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 36:1-5

निर्गम 36:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्रस्थानाचे सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुध्दी व समज घातली आहे ते बसालेल व अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यानी हे बांधकाम करावे.” नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुध्दी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले. आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जी एकंदर अर्पणे आणली होती ती त्यांनी मोशेच्या पुढून घेतली. लोकांनी रोज सकाळी आपली स्वखुशीची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला. शेवटी मग सर्व बुध्दिमान पुरुष पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले. आणि ते मोशेला म्हणाले लोकांनी परमेश्वरासाठी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हांला या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!

सामायिक करा
निर्गम 36 वाचा

निर्गम 36:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्रस्थानाच्या सेवेसाठी सर्व तर्‍हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. लोक भरपूर दाने आणतात नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले, आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी, म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते त्यांनी मोशेकडून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्याजवळ आणण्याचा क्रम चालू ठेवला. इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्रस्थानाचे सगळे काम करीत होते, ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले, आणि ते मोशेला म्हणाले, “परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करायला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणत आहेत.

सामायिक करा
निर्गम 36 वाचा