निर्गम 33:7-9
निर्गम 33:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई. ज्या वेळी मोशे छावणीतून मंडपाकडे जाई त्या वेळी सर्व लोक आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्यास निरखून बघत. जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
निर्गम 33:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशे छावणीबाहेर बर्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शनमंडप1 म्हणे. कोणाला परमेश्वराकडे काही विचारायचे असले म्हणजे तो छावणीबाहेरील त्या दर्शनमंडपाकडे जात असे. आणि असे व्हायचे की, जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जात असे तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे.