निर्गम 28:15-21
निर्गम 28:15-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
न्यायाचा ऊरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा; तो चौरस व दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी. त्यामध्ये रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक; दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणी व हिरा; तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग; आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत. ऊरपटावर इस्राएलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत. त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत. मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.
निर्गम 28:15-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा; तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा. तो चौरस व दुहेरी असावा, त्याची लांबी व रुंदी एकेक वीत असावी. त्यात रत्ने जडवावीत. त्यात रत्नांच्या चार रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक; दुसर्या रांगेत पाचू, नीलकांत मणी व हिरा; तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग; आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत. इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.