निर्गम 2:1-3
निर्गम 2:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लेवी वंशातील एका मनुष्याने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला. ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्यास तीन महिने लपवून ठेवले. पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.
सामायिक करा
निर्गम 2 वाचानिर्गम 2:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली; त्या पेटार्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यांत नेऊन ठेवले
सामायिक करा
निर्गम 2 वाचा