निर्गम 17:9-13
निर्गम 17:9-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांस निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.” यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले. जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकी लोकांची सरशी होई. काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले. तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकी लोकांचा पराभव केला.
निर्गम 17:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, “आपल्यांतले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर; उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.” मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला; मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्या वेळी असे झाले की, मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले; तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला, आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशवाने आपल्या तलवारीच्या धारेने4 अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला.