YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 17:10-14

निर्गम 17:10-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला; मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्या वेळी असे झाले की, मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले; तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला, आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशवाने आपल्या तलवारीच्या धारेने4 अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की, “ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल; कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून5 अजिबात पुसून टाकीन.”

सामायिक करा
निर्गम 17 वाचा

निर्गम 17:10-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले. जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकी लोकांची सरशी होई. काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले. तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकी लोकांचा पराभव केला. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांस पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”

सामायिक करा
निर्गम 17 वाचा

निर्गम 17:10-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले. जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे. जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले. मग याहवेह मोशेला म्हणाले, “या घटनेची आठवण रहावी म्हणून तू ती ग्रंथात लिहून ठेव आणि ते यहोशुआच्या कानी पडेल याची खात्री कर, कारण मी पृथ्वीवरून अमालेकांचा संपूर्णपणे नाश करणार.”