निर्गम 12:13-14
निर्गम 12:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही. हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.
सामायिक करा
निर्गम 12 वाचानिर्गम 12:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही हा दिवस तुम्हास आठवणीदाखल होईल, हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळावा. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा.
सामायिक करा
निर्गम 12 वाचा