निर्गम 12:1-12
निर्गम 12:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वराने मिसर देशात मोशे व अहरोन ह्यांना सांगितले की, “हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा; तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांगा की, ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकेका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे; आणि एक कोकरू खपायचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजार्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे; प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल ह्याचा हिशोब करावा. कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा; ह्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा; आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी तो वधावा. ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडीसुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे. ते तुम्ही ह्या रीतीने खावे : तुमच्या कंबरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा ‘वल्हांडण सण’ (ओलांडून जाण्याचा सण) होय. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.
निर्गम 12:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “हा महिना तुमच्यासाठी आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे. आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती मनुष्यांना पुरेल याचा अंदाज घ्यावा. तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा. या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे. त्या कोकऱ्याचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे. त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर खावे. तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी हीसुद्धा खावीत. त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे. ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे. आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे.
निर्गम 12:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले, “हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल. तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू. जर एखादे कुटुंब एका कोकराच्या मानाने लहान असले तर शेजारच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्यातील लोकांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती किती खाईल यानुसार अंदाज घेऊन, किती कोकरे लागतील हे ठरवावे. एक वर्षाचे निर्दोष नर कोकरू असावे, आणि तुम्ही ते मेंढरांतून अथवा शेळ्यांतून घ्यावे. या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत. ज्या घरांमध्ये ते खातील त्या घराच्या दोन्ही दारपट्ट्यांना व कपाळपट्टीला त्या कोकराचे रक्त घेऊन ते लावावे. त्या रात्री प्रत्येकाने त्या कोकर्याचे विस्तवावर भाजलेले मांस, बेखमीर भाकर व कडू भाजी यांच्याबरोबर खावे. मांस कच्चे किंवा पाण्यात उकळून खाऊ नये, तर विस्तवावर भाजून, त्याचे डोके, पाय व आतड्यांसह खावे. त्यातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये; जर काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण आहे. “कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.