एस्तेर 8:1-3
एस्तेर 8:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा वैरी हामान ह्याचे घरदार एस्तेर राणीला दिले. मर्दखयही राजाकडे आला; कारण त्याचे एस्तेरशी काय नाते होते ते तिने राजाला सांगितले होते. हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमले. मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जव केले; ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, “यहूद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी ह्याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी.”
एस्तेर 8:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू असलेल्या हामानाच्या मालकीची सर्व मालमत्ता राणी एस्तेरला दिली. आणि मर्दखय राजाकडे आला कारण त्याचे एस्तेरशी काय नाते आहे ते तिने राजाला सांगितले. राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले. एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. ती त्याच्या पाया पडून रडू लागली. अगागी हामानाने यहूद्यांचा नायनाट करण्याची आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्यास विनंती करु लागली.